दिल्ली विधानसभा निवडणूक; आपची दुसरी यादी जाहीर, ‘या’ चेहऱ्यांना मिळाली संधी

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) ने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिल्लीत फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात, त्याआधीच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAPने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. प्रचार आणि सभांसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी आपने दोन महिने आधीच आपल्या उमेदवारांची दुसरी यादी तयार केली आहे. या यादीत २० उमेदवारांना संधी मिळाली आहे .
आपने नोव्हेंबरमध्ये पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये ११ उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यापैकी सहा असे नेते आहेत ज्यांनी नुकतेच काँग्रेस किंवा भाजप सोडून केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर तीन असे उमेदवार आहेत जे गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. तरीही ‘आप’ने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना तिकीट दिले.
उमेदवारांची संपूर्ण यादी
- नरेला- दिनेश भारद्वाज
2. तिमारपूर- सुरेंद्र पाल सिंह बिट्टू
३. आदर्श नगर- मुकेश गोयल
4.मुंडका- जसबीर कराला
5. मंगोलपुरी- राकेश जाटव धर्मरक्षक
6. रोहिणी- प्रदीप मित्तल
7. चांदनी चौक- पुनरदीप सिंग साहनी (SABI)
8. पटेल नगर- प्रवेश रतन
9. मादीपूर- राखी बिडलान
10. जनकपुरी- प्रवीण कुमार
11. बिजवासन- सुरेंद्र भारद्वाज
12. पालम- जोगिंदर सोलंकी
13. जंगपुरा- मनीष सिसोदिया
14. देवळी- प्रेमकुमार चौहान
15. त्रिलोकपुरी- अंजना पराचा
16. पटपरगंज- अवध ओझा
17. कृष्णा नगर- विकास बग्गा
18. गांधी नगर- नवीन चौधरी (दीपू)
19. शाहदरा- पद्मश्री जितेंदर सिंग शांती
20. मुस्तफाबाद- आदिल अहमद खान
अनिल झा, बी.बी त्यागी, वीर सिंग धिंगन, ब्रह्मसिंह तन्वर, झुबेर चौधरी आणि सोमेश शौकीन यांनी अलीकडेच आपमध्ये प्रवेश केला. केजरीवाल यांनी आपल्या जुन्या नेत्यांऐवजी अन्य पक्षांतील नेत्यांवर विश्वास व्यक्त केला आहे.