Top 5पुणेशेत -शिवार

पावसाळ्यात झाडांना धोका का?

पुणे : झाडांना अपुरी जागा, प्रत्येक वेळेस झाडाच्या वाढीमध्ये मानवाचा हस्तक्षेप व तसेच जमिनीमधील उष्णतेचा हाहाकार, रस्त्याचे डांबरीकरण व सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे व त्याची जाडी खोलवर ४ फुटापर्यंत वर आली असून, त्यामधून उष्णता बाहेर पडत नाही. सध्या अशी स्थिती आहे, जमिन व रस्त्याच्या मधली पोकळी त्यामधील जास्त प्रमाण वाढल्यामुळे आणि त्यातूनच मानवाने पाणी देण्याचे वेगवेगळे शोध निर्माण करुन झाडांना इतक्या वेदना होत आहेत, त्याचाच एक परिणाम म्हणून निसर्गात बदल होत आहे. वृक्षरोपण व पर्यावरण एक प्रचार प्रसिध्दीचे माध्यम झाले अाहे, अशी खंत हरित मित्र परिवाराचे डॉ. महेंद्र घागरे यांनी व्यक्त केली.

खरेतर वृक्षरोपणासाठी झाडे दोन अडीच फुटाच्या आतील असणे आवश्यक आहे. त्या झाडाला त्याच्या मनासारखे वाढावे, अशी अपेक्षा असताना सगळ्यांचे एक उद्दिष्ट की झाड सरळ वाढावे आणि १० ते १५ फुटाच्या पुढे त्याला फांद्या फुटाव्यात, असे केल्याने झाडाचा बुंधा आणि त्याच्या डोक्यावरची ४ ते ५ फांद्या फुटल्यानंतर त्या बुंध्याला भार झेपत नाही, झाड वाकडेतिकडे होते व पावसाळ्यामध्ये हवा जास्त असल्याने झाडाचा शेंडा तुटला जातो.

महापालिका प्रशासनाकडून धोकादायक झाडांची छाटणी केल्याची नोंद देखील आहे. पण पावसाळा सुरू होताच पालिकेच्या या दाव्याची ‘पोलखोल’ झाल्यावाचून राहात नाही. खरेतर योग्यवेळी छाटणी करणे आणि धोकादायक झालेल्या झाडाबाबत योग्य तो निर्णय घेणे पालिकेकडून आवश्यक असते. झाडे पडून दुर्घटना होऊ नयेत म्हणून पालिकेने विभाग स्तरावर कंत्राटदारांची नेमणूक करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये