Top 5महाराष्ट्रमुंबई
बंडखोर एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं, नावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख!

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असं ठेवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
आपल्यासोबत एकूण ४६ आमदार आहे. शिवसेनेचे दोन-तृतीयांश आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना माझ्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे त्यांच्या गटाला काय नाव देतात, याची उत्सुकता होती. शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे गटानं निश्चित केलं आहे. याबद्दलची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.