ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेनेची बँकखाती ताब्यात घेऊन ठाकरेंची आर्थिक रसद तोडून, नाड्या आवळणार? शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गट हा अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने हालचाली करत शिवसेनेची नवी कार्यकारिणी स्थापन करुन एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेता म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर एकनाथ शिंदे हे आपला मोर्चा शिवसेनेच्या मुंबईतील शाखा आणि यापूर्वी ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेच्या बँक खात्यांकडे वळवणार, अशी चर्चा आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आम्ही शिवसेनेचा निधी किंवा अन्य मालमत्तेवर दावा सांगणार नाही. आमच्यासाठी फक्त बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. मी देणार आहे, घेणारा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गट शिवसेनेची बँक खाती व इतर मालमत्ता ताब्यात घेऊन ठाकरेंची आर्थिक रसद तोडणार, याबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ठाकरे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या काही शाखा टप्प्याटप्प्याने ताब्यात घेतल्या जाऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये