पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

“महापालिकेत जास्त नगरसेवक निवडून आणा”: चंद्रकांतदादांचे आवाहन

पिंपरी : पिंंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरीतून भाजपचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडणून आणण्याचा शब्द प्रदेशाध्यक्षांना दिला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे सरकार आल्याबद्दल अभिनंदन केले. महापालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली.

प्रदेश सचिव अमित गोरखे, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, पिंंपरी प्रभारी सदाशिव खाडे, सह प्रभारी अनुप मोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, भाजप उत्तर भारतीय आघाडीचे राजेश पिे, भाजप सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, माजी उपमहापौर तुषार हिंंगे, केशव घोळवे, माजी नगरसेवक विजय शिंंदे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, जयश्री गावडे, वसंत गावडे, भाजप पदाधिकारी अतुल इनामदार, राजेंद्र बाबर, गणेश ढाकणे आदी उपस्थित होते.

चिंंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी एकत्र असत. त्या तुलनेत पिंंपरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, नगरसेवक एकत्र नव्हते. त्याला कारणही तसेच आहे. मागीलवेळी पिंंपरीत शिवसेनेचा आमदार होता, तर आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे पिंंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, नगरसेवक एकत्र येत नसत. पिंंपरी भाजपला गॉडफादर कोण नव्हता. त्यामुळे काही पदाधिकारी चिंंचवडच्या आमदारांकडे तर काही पदाधिकारी भोसरीच्या आमदारांकडे जात असत. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पिंंपरीतील पदाधिकारी, माजी नगरसेवक एकत्र आले. त्यांनी मुंबईला जात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पिंंपरी विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यावे.

आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. २०२४ मध्ये पिंंपरीचा आमदारही भाजपचा असेल, असा शब्द पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्षांना दिला. पिंंपरीचे भाजप प्रभारी सदाशिव खाडे म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली. त्यामुळे शहरातील पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांची सदिच्छा भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये