पहिल्याच दिवशी भारताने कांगारूंचे मनोबल तोडले; आधी जडेजाने नंतर रोहितने रडवले

नागपूर : (IND vs AUS Test Series 1st Match Day 1) नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोन सत्रातच 177 धावात संपवला. भारताकडून पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने 47 धावात निम्मा संघ ( 5 विकेट्स) गारद केला. तर अश्विनने 3 कांगारू टिपून त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे कांगारुंचा संपूर्ण संघ 177 धावांवर भारताच्या फिरकीच्या जादूगारांनी गारद केला.

त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी (56) खेळीच्या जोरावर भारताने दिवसअखेर 1 बाद 77 धावांपर्यंत मजल मारून दिली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र सिराज – शमी जोडीने त्याची अवस्था 2 बाद 2 धावा अशी केली.

त्यानंतर रविंद्र जडेजाने 49 धावांवर खेळणाऱ्या मार्नसला भरतकरवी स्टम्पिंग केले. जडेजा इथंच थांबला नाही. त्याने पुढेच्यात चेंडूवर मॅट रेनशॉला देखील आल्या पावली माघारी धाडले. जडेजाने 107 चेंडूत 37 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील बाद करत कांगारूंची अवस्था 5 बाद 109 धावा अशी केली. जडेजाने 47 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या तर अश्विनने 3 विकेट्स घेत त्याला साथ दिली. मोहम्मद शमी – मोहम्मद सिराज या वेगवान जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यामुळे कांगारूचा डाव 177 धावात संपवला.

सलामीवीर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. रोहितने 56 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या बाजूने केएल राहुल सावध फलंदाजी करत त्याला उत्तम साथ देत होता. मात्र दिवस संपायला 1 षटक राहिले असताना राहुल 20 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसअखेर भारताला 77 धावांपर्यंत पोहचवले. भारत अजून 100 धावांनी मागे आहे.
