राष्ट्रसंचार कनेक्टशिक्षणसिटी अपडेट्स

शिक्षणक्षेत्रातील वाहती ज्ञानगंगा

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी आलेल्या मारुती नवले या नवयुवकाने शिक्षणाच्या ‘सह्याद्रीवर सिंहगडचे लेणे’ कोरले आणि लाखो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या पाऊलवाटा शोधल्या. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या सिंहगडचे सर्वेसर्वा प्रा. एम. एन. नवले सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सारांश मांडणारा विशेष अंक

पुणे शहर व जिल्हा हे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्यात शैक्षणिक संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वांत मोठे योगदान हे सिंहगड इन्स्टिट्‌‍यूटचे आहे. आज संपूर्ण देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादी पाहिली, तर काही सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सिंहगड’ या नावाचा समावेश आहे.

‘सिंहगड’चे संस्थापक प्रा. एम. एन. नवले यांनी पारंपरिक व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. त्यामुळे ते शिक्षण क्षेत्रातील सिंह म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या शैक्षणिक संस्थेत शिकणारे असंख्य विद्यार्थी हे उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रांत उच्चपदापर्यंत पोहोचले आहेत.

या संस्थेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि शिक्षक, आकर्षक कॅम्पस, अत्याधुनिक सुविधा आहेत. शिक्षणाच्या गुणवत्तेमुळे कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पदांवर नोकऱ्या मिळत आहेत. कालसुसंगत शिक्षण देत संस्थेने देशभरात लौकिक मिळविला आहे. ‘सिंहगड’ शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड आहे.

त्याशिवाय पुण्याच्या शिक्षण क्षेत्राची गाथा पूर्ण होऊ शकत नाही. कोरोनामुळे आणि लॉकडाउनमुळे जगाच्या शिक्षण क्षेत्रावर परिणाम झाला. परंतु ‘सिंहगड’ शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक काम अवरित सुरू आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही संस्था सतत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविण्याचे काम करीत आहे.

शिक्षणाला सर्वांगीण विकास आणि सामाजिक उंचीचे साधन म्हणून शिक्षण करण्यासाठी एम. एन. नवले यांनी 2 ऑगस्ट 1993 रोजी वडगाव येथे सिंहगड संस्थेचा पाया रचला. सर्वप्रथम शिक्षणाच्या प्रवाहाची सुरुवात वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निक इन्स्टिट्‌‍यूटपासून केली गेली. तेथून हा प्रवास सुरू झाला…

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये