
Food Funda | छाया पराठा हॉटेल |
पराठा हा असा पदार्थ आहे जो एकदा खाल्ला तरी मन भरत नाही. पराठ्याचं नाव जरी घेतलं, तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. पराठा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचाच. नुसंत पराठा म्हटलं, तरी खवय्यांना त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय काही राहवत नाही. त्यात लहान मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पराठा हा पर्याय उत्तमच. तर खवय्यांना पराठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर छाया पराठा हॉटेल प्रसिद्ध आहे. छाया पराठा हॉटेलने पराठाप्रेमींना चांगलीच भुरळ घातली आहे.
छाया पराठा हॉटेल हे तपाश सेनगुप्ता यांचं आहे. या पराठा हॅाटेलने त्यांच्या पदार्थांची चव अस्सल, दर्जेदार आणि कायम ठेवल्याने येथे खवय्यांची गर्दी नेहमी पहायला मिळते. छाया पराठा हॉटेलची आलू पराठा, मिक्स पराठा, लच्छा पराठा, पनीर चीज पराठा, सलाड, पनीर टिक्का चाप, लस्सी, चीज गार्लिक नान, राजमा मसाला, कुल्चे छोले, गोबी पराठा, पालक पराठा, मिक्स व्हेज पराठा असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत.
छाया पराठा हॉटेल हे अजमेरा मोरवाडी, अजमेरा हाउसिंग सोसायटी, पुणे येथे आहे. विशेष म्हणजे पराठा म्हटलं, की खवय्यांच्या डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम चविष्ट पराठा, त्यावर लोणी सोबत चटणी आणि लस्सी… आहाहा! त्यामुळे पराठा खाण्यासाठी हौशी खवय्ये कितीही लांबचा प्रवास करून छाया पराठा हॉटेलला भेट देतात. तर तुम्हालाही चविष्ट, अस्सल चवीच्या पराठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर छाया पराठा हॉटेलला भेट द्या.