उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन

नवी दिल्ली | Mulayam Singh Yadav – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील गुरूग्राममधील मेदांता रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज (10 ऑक्टोबर) त्यांनी 8.15 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. तसंच मुलायम सिंह यादव यांच्या निधनानं शोक व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांच्यावर दिल्लीतील गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना आयसीयू वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांचं निधन झालं.
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं ते जीवनरक्षक औषधांवर होते. गुरूग्रामच्या मेदांता हाॅस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ञ डाॅक्टरांच्या मोठ्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात होते. तसंच त्यांना महिनाभराहून अधिक काळ रूग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवड्यात झपाट्यानं खालावली होती. प्रकृती खालावल्यानं त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रूग्णालयात उपस्थित होते.