“जाती देवांनी नाही, पंडितांनी बनवल्या…देवासाठी आपण सार्वजन एक आहोत” – मोहन भागवत

Mohan Bhagvat : सध्या देशात रामचरितमानसवरुन एक नवीन वाद सुरू झाला आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातीवादावर मोठे विधान केले आहे. मोहन भागवत संत शिरोमणी रोहिदास जयंतीनिमित्त (Sant Rohidas Maharaj Jayanti) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. याच कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, जात देवानं नाही तर पंडितांनी निर्माण केली. देवानं नेहमीच सांगितलंय की, माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी वर्गवारी केली, जी चुकीची आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. तसेच, भागवत म्हणाले की, आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी नेहमीच घेतला आहे. असा फायदा घेऊन आपल्या देशात परकीय हल्ले झाले. असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे.
यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेला संत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जाणत्या लोकांनी विरोध केला. ते पुढे म्हणाले, “अस्पृश्यतेमुळे व्यथित होऊन डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. मात्र, त्यांनी अन्य कोणताही धर्म स्वीकारला नाही आणि गौतम बुद्धांनी दाखवलेला मार्ग निवडला. त्यांची शिकवण भारताच्या विचारातही खोलवर रुजलेली आहे.’’