‘अपना राजा अकल से अंधा है भाई’! 7 वर्षांनी ‘फुकरे 3’ आला, डायलॉग तर एकदम सही…

Fukrey 3 Trailer Video : बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले त्या फुकरे नावाच्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहाता, फुकरे-3 चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून फुकरे ३ या चित्रपटाची चर्चा आहे. कॉमेडी आणि सस्पेन्स या प्रकारातील चित्रपटानं प्रेक्षकांची मोठी पसंतीही मिळवली होती. रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, पुलकित सम्राट, यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये होता.
खासकरुन तरुणाईच्या पसंतीस हा चित्रपट पडला होता. आता त्याच्या तिसऱ्या भागाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. पोस्टरसोबतच त्यांनी रिलिज डेटचीही घोषणाही केली आहे. २ मिनिटे आणि ५१ सेकंदाच्या त्या व्हिडिओनं चाहत्यांना खूश केले आहे. तो ट्रेलर तुम्हाला पुन्हा दहा वर्षे मागे नेल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या भागात चूचा आणि हन्नीभाईची सुरुवात शाळेपासून होते. त्यात ते पहिल्यापासून फेल होत असल्याचे दिसून आले होते. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. आता प्रेक्षकांना नव्या चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.