Top 5अर्थपुणे

गायब बीआरटी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर; २७ लाख रुपयांची खिरापत

पुणे : सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हुडकून सापडत नसला, तरी २७ लाख रुपयांचा खर्च स्थायी समितीने मंजूर केला आहे. संपूर्ण रस्त्यावर खर्च केला जाणार असल्याचे मत रस्ता विभागाने केला आहे.

महापालिकेने पंधरा वर्षांपूर्वी स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर असा मार्ग केला. पादचाऱ्यांसाठी तसेच वाहनांच्या सोईसाठी या मार्गावर भुयारी मार्ग व उड्डाणपूल बांधण्यात आले. सोलापूर रस्त्यावर केवळ रामटेकडी उड्डाणपूल ते हडपसर उड्डाणपूल यातील काही भागात बीआरटीची मार्गिका शिल्लक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा मोठा विरोध आहे. त्यामुळे बीआरटीचा मार्ग शोधावा लागत आहे.

असे असताना रस्ता विभागाने सोलापूर रस्ता बीआरटी मार्गाची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी टेंडर काढले. त्यासाठी अंदाजे खर्च ४४ लाख रुपये नक्की करण्यात आला होता. पण हे टेंडर ३७ टक्के कमी दराने आल्याने २७ लाखांच्या खर्चास स्थायी समितीचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली.
आता मार्ग सापडत नाही मात्र खर्च मंजूर केल्यावर हा खर्च संपूर्ण रस्त्यावर केला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. पैसे योग्य कारणासाठी खर्च व्हावेत, हीच जनतेची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये