Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

पुणेकरांनो पाणी जपून ठेवा! अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : Pune Water supply : पुण्यात जी २०परिषदांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्वच्छता, सुशोभीकरणाची आणि दुरुस्त्यांची कामे जोरात सुरु आहेत. अशातच पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील काही जलकेंद्रांच्या तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येणार आहे. G20 Pune Water supply will shut on 19th January

गुरूवारी (१९ जाने) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी (एम.एले. आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर तसेच कोंढवे धावडे जलकेंद्र येथील काही तांत्रिक दुरुस्त्या आणि देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात राहणार पाणीपुरवठा बंद –

वारजे जलकेंद्र : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोडे या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील.

कोंढवे – धावडे जलकेंद्र:- वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यू कोपरे.

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी. सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, बडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, बेदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हो. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, इत्यादी.

इत्यादी भागात १९ जानेवारीला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचबरोबर २० तारखेला सकाळी उशीरा कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये