ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

“…अन् सुमन कल्याणपूर यांचा संगीतप्रवास सुरू झाला; पद्मभूषण पुरस्कारही झाला जाहीर

मुंबई : (Singer Suman Kalyanpur Birthday) ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस आहे. सुमन यांचा यंदाचा वाढदिवस खास असणार आहे. मराठी संगीतक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सुमन यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन (Suman Kalyanpur Birthday) यांनी मराठीसह, गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपट गीतांवर भावगीतेही गायली आहेत. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुमन कल्याणपूर म्हणाल्या की, “भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे मी खरंच भारावून गेले आहे. माझ्या गाण्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी माझं गाणं हृदयात जपून ठेवलं. माझ्या आवाजाचा विसर न पडणं हे माझं खरचं सुदैव आहे, असं मला वाटतं. जेव्हा सर्व पुरस्कारांची आस संपते, त्याच वेळी भारत सरकारने माझ्या गानसेवेचा सन्मान केला ,मी भरभरुन पावले”.

सुमन कल्याणपूर यांचं ‘कोई पुकारे धीरेसे तुझे ऑंख के तारे’ हे रुपेरी पडद्यावरचं पहिलं गीत. सुमन शुद्ध शास्त्रीय आणि नाट्य संगीताकडे फारशा वळल्या नाहीत. सुमनने गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या गीताला मानाचा तानसेन पुरस्कार लाभला आहे. मराठी संगीतक्षेत्रात सुमन ताईंचे बहुमुल्य योगदान आहे. आपल्या आवाजाने त्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे. जुन्या पिढीतील मंडळी आजही त्यांची गाणी गुणगुणताना दिसतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये