‘ज्ञानवापी’ प्रकरणाला नवं वळणं! ‘मंदिर नाही, मशीद नाही, तर हा…’, सुप्रीम कोर्टात दावा

नवी दिल्ली : (Gnanavapi Masjid case of Varanasi) वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात अलहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने निर्णय देत मशीद परिसराचा ASI सर्व्हे करण्याची परवानगी दिलेली आहे. २१ जुलै रोजी वाराणसी जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीशांनी ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचे आदेश दिलेले होते. त्यानंतर मुस्लीम पक्षाने सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये एएसआय सर्व्हे करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
मात्र, आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे. अलहाबाद कोर्टाने सांगितलं की, एएसआयचा सर्व्हे आवश्यक आहे. काही अटी लागू करुन या सर्व्हेची गरज आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता नवं वळणं मिळालं आहे. बौद्ध धर्मगुरुंनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे की, हे मंदिर नाही, मशीद नाही तर हा एक बौध मठ आहे. बौध पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
या याचिकेत ज्ञानवापी हे मंदिर अथवा मशीद नाही तर बौद्ध मठ असल्याचे दावा करण्यात आला आहे. बौद्ध धर्मगुरु सुमित रतन भंते हे म्हणतात, देशात असे अनेक मंदिरं आहेत जे बौद्ध मठ तोडून उभे केलेले आहेत. ज्ञानवापीमध्ये आढळून येणारे त्रिशुळ आणि स्वस्तिक चिन्ह बौद्ध धर्माचे आहेत. केदारनाथ अथवा ज्ञानवापी जिथे ज्योतिर्लिंग सांगितलं जात आहे मुळात ते एक बौद्ध स्तूप आहे. ज्ञानवापी मंदिरही नाही आणि मशीदही नाही. तर तो बौद्ध मठ असल्याचं तिसऱ्या पक्षाचं मत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.