‘पुरुषोत्तम करंडक’ची महाअंतिम फेरी २७ डिसेंबरपासून

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर ते रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुण्यात होणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोकृष्ट प्रायोगिक अशा प्रत्यकी चार एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे.
महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. २७ आणि दि. २८ रोजी सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ आणि दि. २९ रोजी सकाळी ९ ते १ या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांना तिकिट खिडकीद्वारे आपले तिकीट सुनिश्चित करता येणार आहे. सिझन तिकीट ५००/- रुपये असून दैनंदिन (एका सत्रासाठी) तिकीट १५० रुपये आहे.