ग्रुप इव्हेंट 1 कांस्य, स्टिक फाईट 1 कांस्य अशी 2 पदक मिळाले
जिमी जॉर्ज इनडोअर स्टेडियम तिरुवंतपुरम, केरळ येथे लाठी काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, सुरूल, मडू इत्यादी क्रीडा प्रकारात झालेल्या चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेत भारताचा संघ प्रथम स्थानी सिंगापूर द्वितीय व श्रीलंका संघ तृतीयस्थानी राहिला. पुणे जिल्ह्यातील ४७ खेळाडूंनी भारतीय सिलंबन संघाचे प्रतिनिधित्व करत १७ सुवर्ण, १९ रौप्य, ४८ कांस्यपदक जिंकून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. स्वामिनी रवींद्र जोशी यांनी प्रत्येकी दोन कांस्यपदक मिळवून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यांच्या या विजयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नू. म. वी. मुलींची प्रशाला, इयत्ता 10 वी. मध्ये शिकत आहे.पुणे भारत स्काऊट अँड गाईड ग्राउंड सदाशिव पेठ,पुणे, ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन धनकवडी, , महेश बालभवन कोथरूड, इत्यादी ठिकाणी मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वामिनी जोशी हिने आतापर्यंत राज्यस्तरापर्यंत झालेल्या सिलंबम स्पर्धांमध्ये ३ गोल्ड मेडल, ३ सिल्वर मेडल आणि २ ब्रांझ मेडल मिळवले आहेत.