अर्थपिंपरी चिंचवड

विकास योजनेच्या तयारीसाठी जीएसआयप्रणाली उपयुक्त

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे शहरांसाठी पुनर्जीवन आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन राबविण्यात येत आहे. अमृत प्रकल्पाचा भाग म्हणून, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी महाराष्ट्रातील ४४ अमृत शहरांसाठी जीआयएस आधारित मास्टर प्लॅन तयार करणे अनिवार्य केले आहे.

पिंपरी ः पुणे विभागातील १४ अमृत शहरांसाठी जीआयएस आधारित मास्टर प्लॅन फॉर्म्युलेशनवर क्षमता निर्माण कार्यशाळा ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे नुकतीच पार पडली. शहरी जमीन व्यवस्थापन, विकास योजना तयार करण्यासाठी जीएसआयप्रणाली महत्त्वाची असल्याचे महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी सांगितले.

राज्याच्या नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रांत कार्यशाळा घेण्यात आली. नीळकंठ पोमण, संसाधन शास्त्रज्ञ आनंद शाक्य यांच्यासह पुणे विभागातील युनिव्हर्सल डिझाइन लिव्हिंग प्रयोगशाळा प्रतिनिधी आणि पुणे विभाग शहरी स्थानिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान, जीआयएस तंत्रज्ञान, अमृत मार्गदर्शक तत्त्वांचे डिझाइन स्टँडर्ड आणि मास्टर प्लॅन तयार करणे, यावरील सिद्धांत सत्र आणि जीआयएस मध्ये मास्टर प्लॅनवर काम करण्यासाठी जीआयएस प्लॅटफॉर्मवरील अंतिम वापरकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जीएसआयप्रणालीबद्दल मार्गदर्शन करताना मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी भौगोलिक माहिती प्रणाली वापरून सामान्य डिजिटल भू-संदर्भित बेस नकाशे, बिल्डिंग फूटप्रिंट आणि जमीन वापर नकाशे विकसित करणे. अमृत शहरांच्या अखत्यारितील उपयुक्ततांची भौगोलिक-स्थानिक डेटानिर्मिती, महाराष्ट्रातील ४४ अमृत शहरांसाठी जीआयएस आधारित मास्टर प्लॅन तयार करणे, शहरी स्थानिक संस्थेच्या अधिकार्‍यांची क्षमता वाढवणे, हे अमृत प्रकल्पाची उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी जमीन व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन/ विकास योजना हे प्रमुख साधन आहे.

मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे नियोजन क्षेत्राचा अचूक आणि अद्ययावत बेस नकाशा, रस्ते आणि इमारतींचे लेआऊट, विकासाची अवकाशीय व्याप्ती आणि जमिनीच्या प्रत्येक पार्सलच्या वापराविषयी माहिती इ. अत्यंत उच्चवरून बेस नकाशे तयार करणे.

रिझोल्यूशन सॅटेलाइट प्रतिमा आणि भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञान वेळ आणि खर्च यावर प्रभावी उपाय ठरणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, चित्रफितीद्वारे जीआयएसप्रणालीची माहिती देण्यात आली. संसाधनशास्त्रज्ञ आनंद शाक्य यांनी बेस नकाशेसंदर्भात मार्गदर्शन केले. पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, परभणी, लातूर, नांदेड, इचलकरंजी, सातारा, बार्शी, उस्मानाबाद, बीड, उदगीर या १४ शहरांनी कार्यशाळेत सहभाग घेतला असून या शहरांमध्ये जीएसआय प्रणाली राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाद्वारे अमृत मानकांनुसार महाराष्ट्रातील अमृत शहरांसाठी जीआयएस आधारित मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरची नियुक्ती करण्यात आली आहे.

एमआरएसएसीने सर्व अमृत शहरांसाठी जीआयएस आधारित मास्टर प्लॅन तयार केला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, शहरी विकास विभाग आणि संयुक्तपणे शहरी स्थानिक संस्थांच्या अंतिम वापरकर्त्यांसाठी क्षमता निर्माण कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात क्षमता निर्माण कार्यशाळेचे विभागनिहाय नाशिक, पुणे, मुंबई आणि नागपूर येथे आयोजन करण्यात आले. पुणे विभागांतर्गत पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच कार्यशाळा घेण्यात आली. तांत्रिक सल्लागार हेमंत अमराळे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये