Happy Birthday Sushmita Sen: ‘मिस इंडिया’ ते ‘मिस युनिव्हर्स’; जाणून घ्या सुष्मिता सेनबद्दल…

Sushmita Sen | बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.

सुष्मितानं वयाच्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता.

विशेष म्हणजे सुष्मिता 2018 मध्येच ‘मिस युनिव्हर्स’ देखील झाली होती.

1994 साली मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंत सुष्मिता पहिल्यांदा चर्चेत आली. सुष्मितानं बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता.

महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुष्मितानं 1997 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं.

बाॅलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सुष्मिता झळकली आहे.

सुष्मिता चित्रपटांसह लग्न आणि अफेअर्समुळे अनेकदा चर्चेत आली आहे. दिग्दर्शक विक्रम भट्ट, अभिनेता रणदीप हुडा, क्रिकेटर वसीम अक्रम अशा अनेक लोकांसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं.

सुष्मिता आपल्यापेक्षा लहान वयाच्या रोहमन सोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुष्मिता सेन आणि रोहमन शाॅल 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही दिवसांनी त्यांचं ब्रेकअप झालं.

रोहमन शाॅलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिताचं नाव ललित मोदी यांच्याशी जोडलं गेलं. ललित मोदी यांनी जुलै 2022 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुष्मिता आणि त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केलं होतं.

ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे काही रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

सुष्मितानं लग्न न करताही मातृत्व अनुभवता येतं हे दाखवून दिलं आहे. तिनं दोन मुलींना दत्तक घेतलं आहे.

सुष्मिता समाजात अगदी बिनधास्त वावरते. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक ग्लॅमरस, बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सुष्मिताचा ‘ताली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट गौरी सावंत यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात सुष्मिता गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे.