“मी समाज सुधारण्यासाठी बोलतो, पण युट्यूब चॅनलवाले…”; इंदोरीकरांनी झापलं!

पुणे – प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यामुळे ते अडचणीतही आले आहेत. यु-ट्युब चॅनेलवाले त्याच्यातील काही क्लिप्स काढून टाकतात. याचा धसकाच त्यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी यु-ट्युब चॅनेलवाल्यांना झापलं आहे.
प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम करू नका, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी तंबीच दिली आहे. पुण्यामधील शिरूर तालुक्यातील कीर्तनामध्ये ते बोलत होते.
दरम्यान, माझ्या कीर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो. अरे जरा भानावर राहत जा, महाराजांना काय म्हणायचंय त्यांचंही मत जाणून घेत जा, उगाच टीआरपीसाठी दुसऱ्यांच्या इज्जती घालवू नका. अर्थ जरा समजून घेत जा, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.