ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

विकासकामांना गती मिळणार? लोक झोपेत असतानाच कामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार उतरणार रस्त्यावर

पिंपरी-चिंचवड | Ajit Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन तेथील विकास कामांची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. तसंच चुकीचं काम झाल्याचं कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मी पुन्हा एकदा सरकारमध्ये आलो असून झपाट्यानं काम करणार असल्याचंही, अजित पवारांनी सांगितलं. आज (25 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, महापालिकेतील विविध कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मी त्याच्या खोलात जाणार असून जर चुकीचं काम झालं असेल तर कारवाई करणार आहे. मी पुन्हा सरकारमध्ये आलोय. तसंच मी शहरात आल्यानंतर गर्दी होते, रस्ते बंद करावे लागतात त्यामुळे निम्मे पिंपरी चिंचवडकर झोपले असतानाच मी शहरात येऊन विकास कामांची पाहणी करणार आहे.

माझं बारामतीप्रमाणेच पिंपरी चिंचवडवरही लक्ष आहे. लवकरच पिंपरी चिंचवडमधील वर्तुळाकार मार्गाच्या कामाला सुरूवात होणार आहे. तसंच पुणे-नाशिक रेल्वेचं कामंही गतीनं सुरू आहे. मी शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा सोडलेली नाहीये. सर्वधर्मसमभाव ही माझी भूमिका आहे. त्यामुळे सर्वांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं आम्ही काम करणार आहोत, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये