क्रीडाप्रेमींसाठी सुपर संडे! ४ मोठे सामने अन् ३ विजेतेपदाच्या अंतिम लढती; संपूर्ण जगाचे लक्ष

लखनऊ : (ICC Under-19 Women’s World Cup 2023 Final) आजचा दिवस हा क्रिकेटप्रेमींसाठी खास पर्वणी ठरणार आहे. प्रत्येकजन रविवारची सुट्टी कुठेतरी घराबाहेर पडून एंजॉय करण्यात घालतो. आजचा रविवार हा सुपर संडे ठरला आहे. कारण टिव्हीवर चार विविध स्पर्धांचे हायव्होलटेज सामने पाहता येणार आहेत. त्यातच 19 वर्षीय महिलांचा वर्ल्ड कपचा आज फायनल सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे.
प्रथमच खेळवण्यात येत असलेल्या आयसीसी अंडर-19 महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत महिलांच्या भारतीय संघाने शानदार धडक मारली आहे. आज त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा दारुन पराभव केल्यामुळे अंतिम सामन्यात धडक मारता आली आहे, तर दुसरीकडे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपदाच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. हा सामना अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
भारताची फलंदाजी कर्णधार आणि सलामीवीर शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी अवलंबून असेल. तर गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने आपल्या फिरकीच्या जादून विरोधी संघाच्या फलंदाजांचा धूव्वा उडवला असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ सध्या चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, विविध स्पर्धेतील चार महत्त्वपुर्ण लढती आज पाहायला मिळणार आहेत. अंडर-19 महिला विश्वचषक फायनल : भारत विरुद्ध इंग्लंड यांचा सामना संध्याकाळी ५:१५ वाजता खेळवला जाणार असून तो फॅन कोडवर पाहात येणार आहे. तर हॉकी विश्वचषक अंतिम सामना जर्मनी विरुद्ध बेल्जियम स्टार स्पोर्ट्स-हॉट स्टार वर संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया ओपन अंतिम सामना, जिकोव्हिच विरुद्ध सित्सिपास दुपारी २ वाजता, सोनी टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरा टी-२० सामना संध्याकाळी ७ वाजता, स्टार स्टपोर्ट्स, हॉटस्टारवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमींसाठी आजचा दिवस सुपर संडे ठरणार आहे.