इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्दयी बाप! स्वत:च्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, जाणून घ्या नेमकं घडलं काय?

रायबाग | Crime News – बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एक पोलीस बाप स्वत:च्या चार महिन्याच्या बाळाच्या जीवावर उठला. पत्नीनं सासरी उद्या जाऊया असं म्हटल्यानंतर पतीनं रागाच्या भरात स्वत:च्या बाळाला डांबरी रस्त्यावर जोरात आपटले. त्यावेळी या बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या संतापजनक घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार रायबागमधील चिंचली या गावात घडला आहे. बसप्पा रंगप्पा बळनुकी असं आरोपी वडिलाचं नाव आहे. तर संचित बसप्पा बळनुकी असं मृत बालकाचं नाव आहे. बसप्पा केएसआयएसएफमध्ये पोलीस आहे. तर तो अथणी तालुक्यातील दुरदुंडी येथील रहिवासी आहे. बसप्पाचा विवाह 19 महिन्यांपूर्वी झाला होता. तर त्याची पत्नी माहेरी चिंचली येथे गेली होती. त्यामुळे बसप्पा तिला आणण्यासाठी सासूरवाडीमध्ये गेला होता. त्यावेळी पत्नीनं आज सण आहे त्यामुळे उद्या जाऊया असं म्हटलं. त्यानंतर बसप्पाला राग आला आणि त्यानं पत्नीला आजच जायचं असं बजावून सांगितलं.

बसप्पानं बजावून सांगितल्यानंतरही त्याच्या पत्नीनं येण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या बसप्पानं घरासमोर जाऊन आपल्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर जोरात आदळले. त्यामध्ये बाळाला जोरात मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहताच परिसरातील लोक धावत आले आणि त्यांनी बाळाला तातडीनं रूग्णालयात दाखल केलं. पण त्याआधीच बाळाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकराची नोंद कुडची पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी बसप्पावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये