अर्थताज्या बातम्यापुणे

शरद पवारांच्या निकटवर्तीय उद्योजकावर आयकर विभागाची छापेमारी

Income Tax Raid : पुण्यात आयकर विभागाकडून (Income Tax) पुण्यात सहा ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यातच सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Aniruddha Deshpande) यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी झाली आहे. अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत. अनिरुद्ध देशपांडे यांच्या घराची कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आयकर विभागाकडून देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखील ही तपासणी केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील बडे उद्योजक असलेल्या देशपांडे यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. देशपांडे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यासोबतच त्यांचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं बोललं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये