क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

बांगलादेशाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय! कर्णधार शाकीब बाहेर, ‘या’ शिलेदारावर जबाबदारी

पुणे : (IND Vs BAN World Cup 2023) आज एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 चा 17वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करेल.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाही. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नजमुल हसन शांतो कर्णधार आहे.

त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हणाला की, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणार होतो. अशा स्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही फारसे नुकसान झाले नाही. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये