क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

“मी बोललो होतो केएलच्या सासरेबुवांना…!” व्यंकटेश प्रसादच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा

Ind vs Pak Asia Cup 2023 KL Rahul Century : भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कमाल केली आहे. काल आणि आज दोन्ही दिवस भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन चाहत्यांचं मन जिंकलं आहे. भारताची ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा, फलंदाज विराट कोहली अन् केएल राहूल यांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर भारतानं साडेतीनशे धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर रचला आहे.

केएल राहुलनं तर तीन वर्षाच्या कालावधीनंतर शतक पूर्ण केल्यानं त्याचं विशेष कौतुक होतं आहे. त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून टीका होत आहे. आजी माजी भारतीय खेळाडूंनी देखील केएल राहुलला वेगवेगळ्या टीप्स देण्यास सुरुवात केली होती. केएल राहुलनं जर वेळीच त्याची कामगिरी सुधारली नसती तर त्याला विश्वकप साठी मुकावे लागले असते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या होत्या.

यासगळ्यात भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादच्या त्या जुन्या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रसाद आणि केएल राहुलचे सासरे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात प्रसादनं सुनील शेट्टी ला आपण केएल राहुलसाठी स्वामी नारायण मंदिरात जाऊया असे म्हटले होते. ते व्टिट पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये