देश - विदेश

‘इंडिया आघाडी’ एक पाऊल पुढे! ऑक्टोबरमध्ये एकत्र सभा घेणार, मोदी सरकारविरोधात मैदानात उतरणार..

नवी दिल्ली : (INDIA Aghadi Meeting On Bhopal) देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जागावाटपातबाबतही लवकरच चर्चा सुरु करणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीला इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये भाकपचे डी. राजा, सपाचे जावेद अली, कांग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे टीआर बालू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जदयूचे संजय झा, आपचे राघव चड्ढा,
पीडीपी च्या महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरंसचे ओमर अब्दुल्ला, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, झामुमोचे हेमंत सोरेन या नेत्यांचा समावेश होता.

बैठकीत ठरलेले चार महत्त्वाचे मुद्दे के सी वेणुगोपाल यांनी वाचून दाखवले. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होईल. महागाई, बेरोजगारी आणि भाजप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यावर ही सभा होईल असंही त्यांनी जाहिर केलं. इंडिया आघाडीच्या सभेत जातीय जनगणनेचा मुद्दा देखील प्राधान्यक्रमाने घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये