Top 5क्रीडा

भारत-इंग्लंडमध्ये गुरुवारपासून टी20 चा थरार, हिटमॅनकडे नेतृत्त्वाची धुरा!

मुंबई – भारत आणि इंग्लंडमधील अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. आता गुरूवारपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेमध्ये आनंदाची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करत आहे. त्यामुळे भारतीय संघही जबरदस्त पुनरागमन करेल अशी अशा सर्वा क्रीडाप्रेमींना आहे.

भारतीय संघामध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना घेण्यात आलं आहे. उद्याच्या सामन्यामध्ये कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उमरान मलिकला आता इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळते की नाही पाहावं लागेल. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यांमध्ये म्हणावी अशी छाप त्याला पाडता आली नव्हती. मात्र अखेरचं षटक दबावात टाकत त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.

भारतीय संघ – भारत : रोहित शर्मा (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल,

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये