इंडिया की भारत? अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटनं वेधलं सर्वांचंच लक्ष
मुंबई | India Vs Bharat – सध्या भारत (Bharat) आणि इंडिया (India) नावावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावानं एक पत्र व्हायरल झालं होतं. त्या पत्रावर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे भारत आणि इंडिया या नावावरून वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारत माता की जय! असं लिहिलं आहे. सोबतच त्यांनी भारताचा तिरंगा आणि लाल झेंड्याचा इमोजी पोस्ट केला आहे. सध्या बिग बींचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत.
9 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर G-20 डिनरची आमंत्रण पत्रिका व्हायरल झाली होती. या आमंत्रण पत्रिकेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला होता. त्यानंतर इंडिया आणि भारत या नावावरून चर्चा सुरू झाली आहे.