मुलांना स्मार्ट फोनच्या व्यसनापासून वाचवा

पुणे : मुलांचा मोबाइलचा वापर वाढून, वेळेचे बंधन राहीले नाही. मोबाइलवर मुले माईंडक्राफ्ट, गेरेना फ्रीफायर गेम खेळण्यात गुंग होत असून त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. युट्युब, फेसबुक व इतर ॲप्सवर रिल्स बघत बसतात. रात्री उशिरापर्यंत चित्रपट, कार्टून शो टीव्हीवर न बघता मोबाइलवर बघतात. त्यात त्यांचे जागरण होते. जास्त वेळ मोबाइल बघितल्याने पुरेशी झोप होत नाही.
मोबाइलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर आणि डोळ्यांवर दुष्परिणाम वाढले आहेत.
मुले मोबाइल किती वेळ वापरतात, ते काय पाहतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मैदानी खेळ खेळण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. वेगवेगळ्या ॲप्सला चाइल्ड लॉकचा वापर करून मुलांचे मोबाइल वापरणे कमी करता येईल. पालकांनी स्वतः मोबाइलचा वापर कमी करावा व मुलांना वेळ द्यावा.
— डॉ मनजीत संत्रे,
रात्री उशिरापर्यंत मोबाइलचा वापर केल्यास झोप अपुरी होते. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. एकटे राहण्याची सवय जडते. अपचनाची समस्या निर्माण होते. आक्रमकपणा वाढतो. स्मरणशक्ती व एकाग्रता कमी होते.
वयोगट आवश्यक झोप
० ते ३ महिने १४ ते १७ तास
४ ते ११ महिने १२ ते १५ तास
१ ते २ वर्ष ११ ते १४ तास
३ ते ५ वर्ष १० ते १३ तास
६ ते १३ वर्ष ९ ते ११ तास
१४ ते १७ वर्ष ८ ते १० तास