क्रीडादेश - विदेश

“IND VS PAK सामना झाला तर भारताला अशी…”, पाकिस्तानी तरूणीचं आव्हान ठरतंय चर्चेचा विषय

नवी दिल्ली | Pakistani Women Fan Viral Video – आज (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. तसंच जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. पाकिस्ताननं न्यूझीलंडला 7 विकेट्सनं मात देत धडाकेबाज पद्धतीनं फायनल गाठली आहे. आज इंग्लंड आणि भारत यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान, भारत विजयी झाल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान असा फायनलचा सामना रंगणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा असेल. या पार्श्वभूमीवर आजचा सामना भारतानं जिंकावा अशी इच्छा सर्वच जगभरातील क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यात आश्चर्य करून टाकणारी गोष्ट म्हणजे स्वत: पाकिस्तानचे चाहतेही भारत जिंकावा आणि अंतिम फेरीत भारताविरूद्ध पाकिस्तान थरार अनुभवता यावा यासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्ये एका पाकिस्तानी चाहतीचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर पाकिस्तानच्या समर्थनासाठी आलेल्या एका तरूणीनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिनं फायनलमध्ये भारत जिंकावा अशी आशा व्यक्त केली आहे. जर भारत विरूद्ध पाकिस्तान सामना झाला तर भारताला अशी लढत देऊ की त्यांना कायम लक्षात राहील असं ही तरूणी म्हणाली. तसंच पाकिस्तानी गोलंदाज नसीम हा आपला आवडता खेळाडू असल्याचंही तिनं सांगितलं. या तरूणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/JaikyYadav16/status/1590557518803406848

दरम्यान, या तरूणीच्या व्हिडीओवर अनेक भारतीय तरूणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला कडवी झुंज द्यायची तर द्याच असं म्हणत अनेकांनी या पाकिस्तानी तरूणीला उत्तर दिलं आहे, तुमच्या नसीमला आमचा विराट बघून घेईल असा इशाराही या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये