पाकिस्तानला धूळ चारत भारताचा ‘विराट’ विजय, अन् गृहमंत्री शहांकडून तोंड भरुन कौतूक!

नवी दिल्ली : (India vs Pakistan T-20 World Cup Match) रविवार दि. 23 रोजी भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध रोमहर्षक सामन्यात थरारक विजय संपादन केला. त्यानंतर संपुर्ण देशभरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केलं आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विटमध्ये म्हणाले की, ”टी-20 विश्वचषक सुरू करण्याचा योग्य मार्ग, दिवाळी सुरू होत आहे. विराट कोहलीची शानदार खेळी. संपूर्ण संघाचे अभिनंदन.”
टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने या धावसंख्येचा पाठलाग करताना 20 षटकांत 6 विकेट गमावत 160 धावा केल्या आणि सामना 4 विकेटने जिंकला.
One Comment