क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारत आठव्यांदा आशिया किंग! टी 20 ला लाजवेल असा वनडे; अवघ्या 21.3 षटकात खेळ खल्लास!

कोलंबो : (India Vs Sri Lanka Asia Cup Final 2023) भारतीय संघाच्या (India vs Sri Lanka) गोलंदाजांनी आशिया चषक 2023 मध्ये विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं. श्रीलंका संघाला भारतीय संघाने 50 धावांवर आलआऊट केलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव पत्त्यांसारखा कोसळला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. यानंतर चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने धमाकाच केला. त्याने चौथ्या षटकात 4 विकेट्स घेत लंकेची अवस्था 5 बाद 12 धावा अशी केली.

यानंतर श्रीलंका डाव सावरेल असे वाटत होते. मात्र भारतीय वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा करत लंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. मोहम्मद सिराजने कर्णधार शानकाचा शुन्यावर त्रिफळा उडवत आपला पाचवा बळी टिपला. त्यानंतर 17 धावा करत एक बाजू लावून धरलेल्या कुसल मेंडीसला देखील बाद करत आपली सहावी शिकार केली.

श्रीलंकेची 7 बाद 33 धावा अशी अवस्था झाली असताना हार्दिक पांड्याने श्रीलंकेची शेपूट जास्त वळवळू दिली नाही. त्याने उरलेल्या तीन विकेट्स घेत लंकेचा डाव 15.3 षटकात 50 धावांवर संपवला. लंकेकडून मेंडिसने सर्वाधिक 17 तर दुशान हेमनथाने नाबाद 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.

श्रीलंका संघाने 50 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरात भारताने 6.1 षटकात 51 धावा करत विजय मिळवला. शुभमन गिल याने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांची खेळी केली. तर ईशान किशन याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली. भारतानं एकदिवसीय सामन्यात सर्वाधित 263 चेंडू राखून विजय मिळवण्याचाही विक्रम केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये