आंतरराष्ट्रीय नृत्यदिनी सूर, ताल, लयीचा जागर

पुणे : महान नर्तक जीन-जॉर्जेस नवरे यांचा जन्म २९ एप्रिल रोजी झाला. नृत्यविश्वात ते सुधारक म्हणून ओळखले जातात. तेव्हापासून जगभरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश नृत्याच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. जगाच्या कानाकोपर्यात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊ या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास .
- ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ म्हणजेच ‘डान्स डे’ची संस्कृती भारतातसुद्धा मुरायला लागली आहे. व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे, मदर्स डे आदी बरोबर नर्तकांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो ‘डान्स डे..’ वर्षभर नृत्य करीत असलो तरी नर्तक-नर्तिकांसाठी २९ एप्रिल हा ‘स्पेशल’ दिवस असतो. हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. अनेकविध कार्यक्रम, चर्चासत्रे, फ्लॅशमॉब, कार्यशाळा, स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने नृत्याच्या क्षेत्रातील विविध कलाकार एकत्र येतात. ज्यामध्ये नृत्याच्या प्रसारासाठी प्रयत्न करतात ज्यामुळे नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरुकता आणि लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होते.
नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा, तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे. नृत्याद्वारे आपल्या भावना व्यक्त करणे आणि नृत्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. भारतातील नृत्याची परंपराही शतकानुशतके जूनी आहे. नृत्याचा उगम त्रेतायुगात झाला असे म्हणतात. सध्या भारतात अनेक प्रकारचे नृत्य प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये भरतनाट्य्म, ओडिसी, कुचीपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, कथ्थक इत्यादी प्रमुख नृत्यप्रकार आहेत.
नवरे यांनी नृत्यावर ‘लेटर्स ऑन द डान्स’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात नृत्य कलेच्या युक्त्या शिकवल्या आहेत, ज्या वाचून लोक नृत्य करू शकतात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवू शकतात. सध्याच्या वातावरणात नृत्याचे स्वरूप बदलले आहे. परंतु, प्राचीन नृत्य भारतात अजूनही वर्चस्व आहे.