इतरशेत -शिवार

जुन्नरमधील आंब्याला मिळणार भौगोलिक मानांकन; सरकारकडून शर्थीचे प्रयत्न

पुणे : उन्हाळ्याचा सिझन चालू झाला की सर्वात जास्त मागणी असते ती आंब्यांना. महाराष्ट्रात पायरी, हापूस, देवगड, रत्नागिरी अशा विवीध ठिकाणचे आंबे जगभरात प्रसिद्ध आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना भौगोलिक मानांकनाचा दर्जाची मिळालेला आहे.

अशाच प्रकारचा आमराई साठी प्रसिद्ध असलेला भाग म्हणजे जुन्नर. जुन्नर परिसरातील आंब्याला एक विशिष्ट प्रकारची चव, वास अन् गंध असतो. या बाबींचा आणि खास वैज्ञानिक शास्त्रीय आधाराच्या मदतीने जुन्नरच्या हापूसला आता भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

जुन्नरला जर हा मान मिळाला तर पर्यटन आणि व्यापर उद्योगाला बरीच चालना मिळू शकते, असा सरकारचा विश्वास आहे. भौगोलिक मानांकन मिळवून देण्याची जबाबदारी नारायणगावच्या कृषि विज्ञान केंद्रावर सोपविण्यात आली असून यासाठी सरकारनं ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूदही केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये