आयटम साँग्समुळे ‘या’ अभिनेत्रींचं चमकलं नशीब, आता टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे समावेश

सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक अभिनेत्री खूपच लोकप्रिय आहेत. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनय नाही तर आयटम साँग्सद्वारे बॉलिवूडमध्ये आपलं करियर सेट केलं आहे. कोणताही चित्रपट सुपरहिट ठरायला आयटम साँग्स (Item Songs) देखील कारणीभूत असते. तर आता असे अनेक आयटम साँग्स आहेत जे सुपरहिट ठरले आहेत. या साँग्ससोबतच त्यातील अभिनेत्रींचे देखील आयुष्य चमकलं आहे. यामध्ये मग बिपाशा बसू असो किंवा सनी लिओनी असो अशा अनेक अभिनेत्रींनी आयटम साँग्सद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर आता आपण अशा अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी आयटम साँग्स करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसंच आता त्यांचा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीतही समावेश आहे.
1. बिपाशा बसू (Bipasha Basu) – बिपाशा बसू ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती लाईमलाईटपासून दूर आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा बिपाशानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. बिपाशानं ‘बीडी जलाईले’ हे आयटम साँग केलं होतं. हे आयटम साँग प्रेक्षकांना इतकं आवडलं होतं की बिपाशाचं मोठ्या प्रामाणात कौतुक झालं होतं. तिचं हे साँग 2006 साली प्रदर्शित झालं होतं. या आयटम साँगनंतर बिपाशाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

2. मलायका अरोरा (Maliaka Arora) – मलायका अरोरा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आज तिचा चाहता वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. पण मलायकाला आज ही प्रसिद्धी तिच्या एका आयटम साँगमुळे मिळाली आहे. हे आयटम साँग म्हणजे ‘छैंया छैंया’. हे आयटम साँग आजही प्रेक्षक तितक्याच आवडीनं पाहतात. या गाण्यानं प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं आहे. यामध्ये मलायकासोबत शाहरूख खान देखील दिसला होता. या आयटम साँगनंतर मलायकाचं आयुष्यच बदलून गेलं. आज तिचा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे.

3. शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) – शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या अभिनयासोबत तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. पण शिल्पाला खरी ओळख मिळाली ते तिनं केलेल्या आयटम साँगमुळे. शूल चित्रपटातील ‘मैं आयी हूं यूपी बिहार लुटने..’ हे आयटम साँग करत शिल्पा चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. तिचं हे आयटम साँग चांगलंच सुपरहिट ठरलं होतं.

4. नोरा फतेही (Nora Fatehi) – नोरा फतेहीची एक उत्तम डान्सर म्हणून सगळीकडे ओळख आहे. तिनं आत्तापर्यंत अनेक आयटम साँग्स केलेले आहेत. पण नोरा खरी चर्चेत आली ती सत्यमेव जयते चित्रपटातील ‘दिलबर’ या आयटम साँगमुळे. तिचं हे आयटम साँग चांगलंच सुपरहिट ठरलं होतं. या साँगनंतर नोराचं नशीबच चमकलं आणि आज ती बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
