पुण्यात जैन समाजानं पाळला बंद, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

पुणे | Jain Samaj Bandh – आज (21 डिसेंबर) पुण्यात (Pune) जैन समाजानं बंद (Jain Samaj Bandh) पाळला आहे. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ या समाजाकडून पुण्यात बंदचं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे पुण्यातील जैन धर्मियांची 15 हजार दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.
जैन समाजानं पाळलेल्या बंदमुळे पुण्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर तुरळक गर्दी होती. झारखंडमधील श्री सम्मेद शिखर हे जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. आता या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे जैन समाजाकडून या निर्णयाला विरोध असल्यानं पुण्यातील दुकानं आज बंद पाहायला मिळाली.
दरम्यान, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा, जर त्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा जैन धर्माच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.