ताज्या बातम्या

जम्मू-काश्मिरात LED स्फोटात 5 जवान शहीद; बिळात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना काही केल्या लगाम बसताना दिसत नाहीय. दहशतवाद्यांनी भर पावसात भारतीय सैन्याच्या एका वाहनावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आलेली. त्यानंतर आजही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयईडी स्फोटात एका अधिकाऱ्यासह काही जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

दरम्यान, परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी या परिसराला सर्व बाजूंनी घेरले. राजौरी जिल्ह्यातील बनयारी पर्वतीय क्षेत्रातील डोक परिसरात ही चकमक सकाळपासून सुरू आहे. चकमक आणि चकमकीदरम्यान झालेल्या स्फोटात अनेक दहशतवादी ठार झाल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे भारत दौऱ्यावर आहेत. अशात राजौरी येथील ही घटना मोठी घटना आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये