फिचरराष्ट्रसंचार कनेक्टहिस्टाॅरिकल

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’

अहमदनगर : ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. हे शिखर अहमदनगर जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.

शिखरावर कळसूबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसूबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करीत असे. कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसूबाईला ते आपली देवी मानतात. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये