कंगनाचा अप्रत्यक्षपणे आलिया-रणबीरला टोला, म्हणाली ‘ते दोघे एकाच बिल्डिंगमध्ये वेगळ्या ठिकाणी…’

मुंबई | अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे सारखी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरून ती आपले मत व्यक्त करत असते. अनेकदा ती असं काहीतरी बोलून जाते ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतात. आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
या पोस्टमध्ये कंगनाने लिहिलं, “मी जिथे कुठे जाते, तिथे माझा पाठलाग केला जातो. रस्त्यापासून माझ्या घराच्या पार्किंगपर्यंत माझी हेरगिरी करण्यासाठी लोक झूम लेन्स लावतात. इथे सर्वांनाच माहीत आहे की, पापाराजी बॉलिवूड कलाकारांकडे तेव्हाच जातात, जेव्हा त्यांना त्या कामाचा पैसा मिळतो. पण जर मी किंवा माझ्या टीमपैकी कोणी त्यांना एकही पैसा देत नाही. तर मग माझ्या प्रत्येक गोष्टीची खबर ठेवण्यासाठी यांना पैसा कोण पुरवत आहे? सकाळी 6:30 वाजता माझे फोटो क्लिक केले गेले. मला माहीत नाही त्यांना माझी सर्व कोण देत आहे.”
पुढे ती म्हणते, “या सगळ्याच्या मागे इंडस्ट्रीतील नेपो माफिया असू शकतात. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या व्हॉट्सअॅप डेटापासून ते प्रोफेशनल आणि पर्सनल माहिती लीक केली जात आहे. आता हे माफिया माझ्या घरापर्यंत पोहोचले आहेत. ही तिच व्यक्ती आहे ज्याने आपल्या पत्नीला निर्माती होण्यास भाग पाडलं आणि स्त्रीप्रधान भूमिका साकारण्यास सांगितलं. ती माझ्यासारखेच कपडे परिधान करते.”
कंगनाने इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर त्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “तिने तिच्या लग्नात तशीच साडी परिधान केली होती. जशी मी माझ्या भावाच्या लग्नात रिसेप्शनसाठी परिधान केली होती. या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र आहेत. पण माझे चांगले फिल्म कॉस्ट्यूम डिझायनर मित्र, ज्यांना मी खूप वर्षांपासून ओळखते. हे कपल त्यांच्याबरोबर काम करत आहे. माझे स्वतःचे फायनेन्सर्स आणि बिझनेस पार्टनर्स अखेरच्या क्षणी काहीच कारण न देता माझ्याबरोबर डील करण्यास नकार देतात. मला असं वाटतं की हे लोक मला मानसिक तणाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते दोघंही एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे राहतात. तिने असं करणं बंद करायला हवं आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. जर ती संकटात सापडली तर तिच्याबरोबर तिचं बाळही संकटात सापडेल. त्यामुळे माझा सल्ला आहे की तिने स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी आणि तो काही चुकीचं करत नाहीये ना याची शहानिशा करावी. प्रिय मुली तुला खूप प्रेम आणि तुझ्या बाळालाही.”

कंगनाच्या या स्टोरीवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. कंगनाने आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्याकडे इशारा केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने दावा केला आहे की रणबीर आणि आलिया एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे राहत आहेत. याशिवाय कंगनाने या दोघांवर इतरही आरोप केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.