“आज बाळासाहेबही म्हणाले असतील, शाब्बास संजय”!

मुंबई : (kedar dighe on sanjay raut) पत्राचाळ घोटाळाप्रकरणी साडेनऊ तास घरी चौकशी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीला न घाबरल्याने बाळासाहेबही म्हणाले असतील. शाब्बास संजय! असे ट्विट केदार दिघे यांनी केली आहे. त्यांनी यानिमित्ताने एकप्रकारे संजय राऊत यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
या पोस्टमध्ये केदार दिघे म्हणाले, ‘ना डर, ना सत्तेचा लोभ, ना मला वाचवाची भीक मागितली. तो योद्धा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी! दिल्ली समोर झुकणार नाही! जे घाबरून पळाले ते शिवसैनिकअसू शकत नाहीत? अशा प्रकारेची ट्विट त्यांनी केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची रविवारी दि. 31 रोजी ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर केदार दिघे ॲक्टीव्ह होत उघडपणे बोलत असल्याचे यानिमित्त पाहायला मिळाले. एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न यातून केला आहे.