ताज्या बातम्यामनोरंजन

KGF चित्रपटातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मुंबई | Krishna G Rao Passes Away – ‘केजीएफ’ (KGF) या सुपरहिट चित्रपटात महत्वाची भूमिका साकारलेले अभिनेते कृष्णा जी राव (Krishna G Rao) यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसंच बेंगळुरूमधील विनायक रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयातच कृष्णा जी राव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कृष्णा जी राव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. तसंच कृष्णा जी राव यांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

KGF चित्रपटात कृष्णा जी राव यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. कृष्णा यांनी केजीएफमध्ये तीच भूमिका साकारली होती, ज्यामुळे रॉकीची ओळख होते. तीच वृद्ध व्यक्ती ज्यामुळे यश म्हणजेच रॉकीला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.

कृष्णा जी राव हे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते, त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत केजीएफ चित्रपटाच्या प्रॉडक्शन कंपनीनं ट्विट करत माहिती दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये