केंद्राकडून इर्शाळवाडी दुर्घटनेची दखल! गृहमंत्री अमित शहा यांचं मदतीचं आश्वासन

Khalapur Irshalwadi Landslide : महाराष्ट्रातील रायगड जिह्यातील खालापूर शहराजवळ अतिवृष्टीमुळे इर्शाळवाडी गावावर मध्यरात्री डोंगर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 100 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर अनेकजन अडकले असल्याची भिती निर्माण होत आहे. सध्या मदतकार्य चालू आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घडनास्थळी पोहोचल्या आहेत. या दुर्घतनेत आदिवासींच्या घराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी ३० हून अधिक कुंटुंब अडकली होती. राज्याच्या काही भागात संततधार पाऊस पडत असतान, भारतीय हवामान विभागाने (IMD) रायगडसाठी “रेड अलर्ट” जारी केली आहे. या घटनेनंतर बचाव कार्यात मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थाना केलं आहे.
रायगडचे जिल्हायधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितलं की, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून उपविभागीय अधिकारी आणि खोपोलीचे तहसीलदार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेटी दखल घेत अमित शहांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणं केलं आहे.
NDRF च्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून आहेर काढले आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर “रेस्क्यू ऑपरेशन” सुरु असून एकूण अनेक जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश.