वस्त्रहरण..!

मुंबई | Kirit Somaiya Viral Video Case – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून, हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर अनेक राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त दिल्या जात आहेत. तसेच सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला जात आहे. या व्हिडीओवरून स्वत: किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीने दाखवलेल्या क्लिप्सची सत्यता पडताळावी, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मंगळवारी विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले होते.
संजय राऊतांचे ट्वीट
जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका.
नेमके तसेच घडत आहे. यापुढेही बरेच काही घडणार आहे.
सोमय्यांचे पत्र
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही.
जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठीशी घालणार नाही. कुठलेही प्रकरण दाबले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
— देवेंद्र फडणवीस गृहमंत्री
माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राइव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो.
— अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
ईडी, सीबीआय नको, थेट रॉची चौकशी मागे लावा. त्यांनी आज जे पत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी हा व्हिडीओ खोटा आहे, असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं आहे की, मी कुणावर अत्याचार केला नाही याचा अर्थ हा व्हिडीओ खरा आहे. तत्काळ गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी.
— अनिल परब आमदार, ठाकरे गट