“उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे”

मुंबई – kirit-somiaya On Uddhav Thackeray | राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने आज या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हे तर होणारच होतं, उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे. माफिया सरकारच्या माफिया सरदारला असं वाटतय, की गुंडांसारखं राज करायचं. परंतु हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत मान्य नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, माफियागिरी करणाऱ्या सरकारला न्यायालय अशाच पद्धतीने अनेक धडे शिकवले आहेत, शिकवत राहणार आणि शेवटचा धडा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता शिकवणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.