शिंदेंनी आई त्यांनी बाजारात विकली म्हणत, पेडणेकरांनी ठाकरेंच्या नव्या पक्षाचे नावही सांगितलं!

मुंबई : (Kishori Padnekar On Eknath Shinde) शनिवार दि. 9 रोजी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यार तात्पूर्ती बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभीमीवर ठाकरे गटातील नेत्यांच्या आता संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
दरम्यान, यानर मुंबईच्या माजी महापौर आणि नेत्या किशोरी पेडणेकर या म्हणाल्या आहेत, शिवसेना हा केवळ पक्ष नसून ते एक कुटुंब आहे. शिंदे गटाने आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आईला बाजारात विकलंय, शिवसेना या देशातील एकमेव असा एक पक्ष आहे, ज्याचा उच्चार स्त्रीलिंगी होतो. त्यामुळे या पक्षाला मातृत्त्वाचे स्थान असल्याचे त्या म्हणाल्या.
शिंदे गटाचे खरे चिन्ह हे कमळ आहे, परंतू त्यांच्याकडून विनाकारण पक्षाच्या चिन्हावर दावा केला जात आहे. सामान्य जनतेच्या मनात यामुळे मोठ्या प्रमाणावर चिड निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या कानात कुणीतरी सांगितलं आहे म्हणून असा निर्णय देण्यात आला आहे. बापाचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणत्या न्यायालयाची गरज नसून अंधेरी-पूर्व पोटनिवडणूकीत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हेच आमच्या पक्षाचे नाव असेल, असं पेटणेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.