क्रीडा

BCCI ला लक्ष्मी पावली, तब्बल इतक्या हजार कोटींना विकले IPLचे मीडिया राइट्स!

मुंबई – IPL Media Rights | जगातील सर्वात लोकप्रिय लीगपैकी एक असलेल्या आयपीएल लीगच्या माध्यम हक्कांचा लिलाव आज संपला आहे. याबाबत आयपीएलच्या अधिकृत ट्विटरवरून आणि बीसीलीआयचे सचिव जय शहा यांनी माहिती दिली आहे.

2023 ते 2027 या काळात आयपीएलचे टीव्ही प्रसारण हक्क स्टारकडे आणि डिजिटल राइट्स वायाकॉमकडे (Reliance) असणार आहेत. पाच वर्षांसाठीच्या एकूण चार पॅकेजेसला 48 हजार 390 कोटी मिळाले आहेत.

दरम्यान, वायकॉम-18 ने 23 हजार 775 कोटी रुपयांना डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. वायाकॉम-18 ने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंग्डममधील प्रसारणाचेही हक्क विकत घेतल्याची जय शहा यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये