लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न, ‘हा’ आहे विशेष देखावा!
![लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न, 'हा' आहे विशेष देखावा! Lalbagcha Raja](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Lalbagcha-Raja--780x470.jpg)
मुंबई : (Lalbagcha Raja Ganapati Ananaran) लालबागच्या राजाचं यंदाचं हे ८९ वे वर्ष आहे. बप्पाचा देखाव्यासाठी यावर्षी अयोध्येतील राम मंदिराचा साकारला असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. बुधवार दि. 31 रोजीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी राजाची यंदाची गणेश मुर्ती मंडपात विराजमान झाली आहे. यावेळी हजारो भाविकांनी मुखदर्शनासाठी गर्दी केली आहे.
दरम्यान, लालबागचा राजा या बप्पाचे सोमवारी संध्याकाळी ७ वाजता अनावरण झालं. बाप्पाचं पहिलं रुप पाहण्यासाठी अर्थात मुखदर्शनासाठी भाविकांची मोठा जनसागर उसळला आहे. पडदा ढकलला आणि त्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. याच भक्तीमय वातावरणात बप्पांचे अनावरण करण्यात आले.
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी आलेल्या उपस्थितांमध्ये उत्साह दिसून येत होता. यावेळी अनेक फोटोग्राफर्स आणि नागरिकांची बप्पांचं पहिलं रुप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धडपड पहायला मिळाली. सगळा परिसर बप्पांच्या मुखदर्शनानं आनंदात न्हावून निघाला.