लोकमान्य सोसायटी स्थापना दिन उत्साहात साजरा; ग्राहक, सभासदांकडून शुभेच्छांचा वर्षाव

पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि
चा २८ वा स्थापनादिन गुरूवार, ३१ ऑगस्ट २३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सेनापती बापट रोडवरील मुख्य कार्यालयात स्थापनादिनाच्या निमित्ताने ठेवीदार, सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे येथील मुख्य कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
लोकमान्य सोसायटी
च्या पुणे मुख्य कार्यालयात संपूर्ण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सर्व ठेवीदार-सभासद, हितचिंतक व मान्यवर पुणेकरांनी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊ शुभेच्छा दिल्या. लोकमान्य सोसायटीतर्फे विभागीय व्यवस्थापक श्री. सुशील जाधव यांनी सर्वांच्या स्वागत केले व शुभेच्छांचा स्वीकार केला. मुख्यालयात व शाखा कार्यालयांमध्ये शुभेच्छा देणाऱ्यांसाठी येणाऱ्या पुणेकरांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रसारमाध्यम, वैद्यकीय, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
लोकमान्य सोसायटी
चे ठेवीदार व सभासदांशी एक अतूट नाते गुंफले गेले आहे. आपल्या शुभेच्छांसह गुंतवणुक योजना संबंधाने आग्रहाने आपले मत मांडणाऱ्या, त्यास प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांनी वर्धापनदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
वित्तीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक व्याजदर, गुंतवणुक योजना व पारदर्शक व्यवहाराच्या बळावर पुणेकरांच्या पसंतीला उतरलेल्या लोकमान्य सोसायटी
ने पुणे महानगरसह राज्यभरात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्तम अशी कामगिरी बजावली असून त्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी प्रतिक्रिया लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिच्या पुणे विभागीय प्रमुख श्री. सुशील जाधव यांनी या निमित्ताने दिली.