टीव्ही मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; मजुराचा शॉक लागून मृत्यू

मुंबई | Imlie Serial – एकीकडे राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमानानं उत्साहाचं वातावरण असताना दुसरीकडे एक वाईट घटना घडली आहे. ‘इमली’ (Imlie) या टीव्ही मालिकेच्या (TV Serial) सेटवर मोठा अपघात घडला आहे. या मालिकेच्या सेटवर एका मजुराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.
‘इमली’ या मालिकेचा सेट मुंबईतील गोरेगाव दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये आहे. या मालिकेच्या सेटवर एका मजुराचा मृत्यू झाला आहे. महेंद्र असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मेहंद्र हा अनेक काळापासून इमली मालिकेच्या सेटवर काम करत होता. तर काल (19 सप्टेंबर) सेटवर महेंद्रला शॉक लागल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महेंद्रला याआधीही त्याठिकाणी शॉक लागला होता. त्यामुळे त्यानं त्याच्या सहकाऱ्यांना तिथे न जाण्याचा सल्ला दिला होता. पण महेंद्रला पुन्हा त्याच ठिकाणी शॉक लागला. ज्यावेळी त्याला शॉक लागला त्यावेळी त्याचा श्वास चालू होता. त्यानंतर प्रोडक्शन टीमनं तातडीनं रूग्णवाहिका बोलावली. पण रूग्णालयात जात असतानाच महेंद्रचा मृत्यू झाला.
याप्रकरणी इमली मालिकेच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. तर या घटनेनंतर इमली मालिकेचं शूटिंग काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे.